मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांसाठी

महत्वाच्या सूचना


१) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा. बचत गटाचे खाते राष्टीयकृत बँकेच्या शाखेतच असावेत.

२) बचत गटामध्ये किमान १० सदस्य असावेत, त्यापैकी ८०% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतीलच असावेत.

३) बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

४) गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांनी दिलेले असावेत.

५) बचत गटाचे खाते हे बचत गटाच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत असावेत व अध्यक्ष व सचिव यांचे आधार त्या खात्याशी सलग्न्न केलेले असावेत.

६) बचत गटाने व गटातील सर्व सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

७) मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल मर्यादा ही रक्कम रु. ३.५० लक्ष इतकी राहील,बचत गटांनी या रक्कमेचे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यांनतर खरेदीचे मूळ दस्तायेवाज व RTO कार्यालयाचे नोंदणी पुस्तक या कार्यालयास प्राप्त झाल्या नंतरच रक्कम रु. ३.१५ लक्ष शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

८) पात्र अर्जाची संख्या प्राप्त उद्दिष्ठापेक्षा जास्त असल्यास निवडप्रक्रिया ड्रा पद्धतीने करण्यात येईल.

९) बचत गटातील किमान एका सदस्याकडे वाहन चालविण्याचा परवाना किंवा तसे प्रशिक्षण घेतल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे.

१०) बचत गटांना किमान ९ ते १८ अश्वशक्तीचा किंवा त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचा मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतिल, परंतु बचत गटांना रक्कम रु.३.१५ लक्ष एवढेच शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, जास्तीची रक्कम बचत गटाने स्वतः भरावी.

११) प्रस्ताव परिपूर्ण सादर करण्याची जबाबदारी अध्यक्ष व सचिवांची राहील.